Special Report | भाजपच्या Sting Operation वर Sharad Pawar यांचे सवाल – Tv9

Special Report | भाजपच्या Sting Operation वर Sharad Pawar यांचे सवाल – Tv9

| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 9:40 PM

एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबईः एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे. एखादी व्यक्ती सार्वनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळलं की तुम्ही सांगितलेल्या लोकांच्या तक्रारीत मी लक्ष घातलं. अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत याची काळजी घेईल. हा प्रश्न माझ्याबाबत तिथे संपला.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.