Special Report | तेजस मोरेच्या एन्ट्रीनं नेमकं कोण अडचणीत येणार?
प्रवीण चव्हाण यांनी जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केलाय. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावं पुढे येणार आहेत. तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षांकडे होते. मग ते गप्प का होते? कारण, त्यांना व्हिडीओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक व्हिडीओ बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली. फडणवीसांच्या आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे आरोपांच्या केंद्रस्थानी आलेत. दरम्यान, प्रवीण चव्हाण यांनी जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केलाय. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावं पुढे येणार आहेत. तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षांकडे होते. मग ते गप्प का होते? कारण, त्यांना व्हिडीओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
त्याचबरोबर चौकशीनंतर सर्व गोष्टी पुढे येतील, थोडा वेळ द्या. या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री किंवा सरकारकडून माझ्याशी काही बोलणं झालं नाही. या प्रकरणात एक माजी पत्रकार आणि एक कॉन्स्टेबलही सहभागी आहे. लवकरच त्यांची नावं समोर येतील, असा दावाही चव्हाण यांनी केलाय. माझा सरकारशी आणि कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नसल्याचंही चव्हाण यावेळी म्हणाले.
