Special Report | नवाब मलिक VS सुरेश धस यांचा नवा संघर्ष

| Updated on: Dec 21, 2021 | 9:28 PM

आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, जो भाजप प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन राजकारण करत आहे. त्याच भाजपचे नेते राज्यात प्रभू रामांच्या मंदिराच्या जमिनी हडपत आहे, असा घणाघाती हल्लाही मलिक यांनी केला.

Follow us on

दरम्यान, मलिक यांच्या आरोपांना सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. माझी संपत्ती चार कोटीची आहे. मलिक यांनी माझी संपत्ती घ्यावी. मला पाच पन्नास द्यावेत म्हणजे माझे कर्ज तरी फिटेल असं सांगतानाच मलिक यांच्यावर मला आता अब्रुनुकसानीचा दावा करावा लागेल, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला आहे. एक हजार कोटीच्या घोटाळ्याचे मलिक आकडे सांगत आहेत. माझी स्वत:ची प्रॉपर्टी चार कोटी रुपयांची आहे. माझी सर्व मालमत्ता मलिकांना देतो. मला पाच पन्नास द्या. माझ्यावरील कर्जपाणी फिटून जाईल. एक हजार वगैरे… आणि ईडी… एवढ्या लांब आम्हा छोट्या माणसाला कशाला नेऊन घालता हो. काहीही बोलायचं… कुठला तरी माणूस माहिती देतो त्याच्या आधारावर जबाबदार मंत्र्याने बोलावं यापेक्षा मोठं दुर्देव नाही, असं सुरेश धस म्हणाले.