Special Report | तेलंगनाचे K.C.Rao आणि Uddhav Thackeray यांची एकजूट? -tv9

Special Report | तेलंगनाचे K.C.Rao आणि Uddhav Thackeray यांची एकजूट? -tv9

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 9:08 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. मागील काही दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. या बैठकीला राव यांच्यासोबत काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते.

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. मागील काही दिवसांपासून या भेटीची चर्चा सुरु होती. या बैठकीला राव यांच्यासोबत काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हे देखील या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीनंतर के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान दिलंय.

Published on: Feb 20, 2022 09:08 PM