Special Report | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बंपर लॉटरी

Special Report | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बंपर लॉटरी

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 10:20 PM

बस आणि रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असते. अशा चाकरमान्यांसाठीही सरकारनं महत्वाची घोषणा केलीय. या चाकरमान्यांसाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गांवर टोल माफ करण्यात येणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. तर आज दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमधून एकूण 1800 प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले आहेत.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षावधी असते. या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे गाड्या देण्यात आल्या आहेत. बस आणि रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असते. अशा चाकरमान्यांसाठीही सरकारनं महत्वाची घोषणा केलीय. या चाकरमान्यांसाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गांवर टोल माफ करण्यात येणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. तर आज दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमधून एकूण 1800 प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले आहेत. गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी चाकरमान्यांना एक्सप्रेसची खास व्यवस्था केली.