Special Report | राज ठाकरेंना पहिल्यांदाच यूपीचं धोरण का आवडलं?-TV9
मुंबई आणि देशाच्या राजकारणासाठी 'उत्तर प्रदेश' नावाचं एक राज्य हीच एक स्वतंत्र वोटबँक आहे. उत्तर भारतीयांविरोधात मराठी अस्मितेचं कार्ड खेळा, किंवा मग उत्तर भारतीयांना सोबत घेऊन देशाच्या एकतेचा नारा द्या. दोन्ही बाजूंनी एक मोठा समूह केंद्रीत होत आलाय.
- मुंबई आणि देशाच्या राजकारणासाठी ‘उत्तर प्रदेश’ नावाचं एक राज्य हीच एक स्वतंत्र वोटबँक आहे. उत्तर भारतीयांविरोधात मराठी अस्मितेचं कार्ड खेळा, किंवा मग उत्तर भारतीयांना सोबत घेऊन देशाच्या एकतेचा नारा द्या. दोन्ही बाजूंनी एक मोठा समूह केंद्रीत होत आलाय. राज ठाकरेंच्या मनसेच्या स्थापनेची गुढी याच यूपी-बिहारच्या लोंढ्याविरोधात उभी राहिली. 2013-14 च्या काळात मराठी माणसांच्या अस्वस्थतेला राज ठाकरेंच्या रुपानं एक आक्रमक चेहरा मिळाला. नोकऱ्यांपासून दुकानांपर्यंत आणि घरांपासून फुटपाथपर्यंत मराठी लोकांवरच्या अन्यायाला राज ठाकरेंनी खळ्ळखट्याकनं उत्तर दिलं. भाजपला 2 वरुन 87 खासदार गाठण्याची किमया याच उत्तर प्रदेशनं करुन दिली. काँग्रेसच्या काळातही दिल्ली राखण्यासाठी बड्या मंत्रीपदांची माळ यूपीच्याच गळ्यात पडत राहिली. स्वतः मोदी सुद्धा उत्तर प्रदेशातूनच लढले.
