Special Report | अग्निपथ योजनेला तरुणांचा आक्षेप का?-tv9

| Updated on: Jun 16, 2022 | 10:10 PM

अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातल्या चार मोठ्या राज्यात असा वणवा पेटलाय...बिहार... हरियाणा...राजस्थान..आणि मध्यप्रदेशातले युवक अग्निपथ योजनेच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत...बिहारच्या छपरा जिल्ह्यात आंदोलकांनी ट्रेन जाळली.

Follow us on

अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातल्या चार मोठ्या राज्यात असा वणवा पेटलाय…बिहार… हरियाणा…राजस्थान..आणि मध्यप्रदेशातले युवक अग्निपथ योजनेच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत…बिहारच्या छपरा जिल्ह्यात आंदोलकांनी ट्रेन जाळली..हरियाणात रास्ता रोको करण्यात आला..राजस्थानमध्ये जाळपोळ झाली…मध्य प्रदेशातही आंदोलन झालं..अग्निपथ योजनेविरोधात सर्वात उग्र आंदोलन झालं ते बिहारमध्ये…बिहारमधल्या बेगुसराय, जहानाबाद, नवादा, मुंगेर, आरा, सहरसा, कैमूर या शहरांमध्ये शेकडो तरुण रस्त्यावर उतरले..काही तरुणांनी जाळपोळ आणि दगडफेकही केली. अग्निपथ योजनेनुसार साडेसतरा ते 21 वर्षे वय असलेल्या तरुणांसाठी सैन्यदलात भरती प्रक्रिया राबवण्यात येईल..यानुसार तरुणांना 4 वर्षे सैन्यदलात काम करता येईल..प्रत्येक भरती प्रक्रियेवेळी किमान 50 हजार सैनिकांची भरती होईल..सुरुवातीचे 6 महिने त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल..