ST Employee Strike | तब्बल 2053 ST कर्मचाऱ्यांचं निलंबन, आज दिवसभरात 1135 कर्मचाऱ्यांवर कारवाई

ST Employee Strike | तब्बल 2053 ST कर्मचाऱ्यांचं निलंबन, आज दिवसभरात 1135 कर्मचाऱ्यांवर कारवाई

| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 8:51 PM

शासन आंदोलन संपवण्याकरता निलंबनाची कारवाई करत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी विभागातील सर्व डेपोमध्ये आंदोलन तीव्र केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील बससेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. चाकरमानी कोंडीत सापडले असून, खासगी प्रवासी वाहतूकदारांनी पुण्यासाठी 1000, औरंगाबादसाठी 1200, मुंबईसाठी 600, नंदुरबारसाठी जवळपास 1600 रुपयांचे भाडे आकारणे सुरू केले आहे. इतके करूनही प्रवासाला वाहन मिळत नाही. हे पाहता लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने सर्वसामान्यांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनानेही कडक कारवाई करत आज दिवसभरात 1135 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.