Special Report | महाराष्ट्रात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उपाय काय?

Special Report | महाराष्ट्रात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उपाय काय?

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 9:45 PM

मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांच्यावर निशाणा साधलाय. अनिल परब माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी पडळकर आणि खोत यांच्याशी दोन वेळा बोललो आहेत. त्यांच्यासमोर सरकारचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील. नाहीतर कामगार त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील. मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परब यांनी केलंय.