Sudhir Mungantiwar : भाजपची तुलना… शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची निवडणुकीनंतर BJP नेतृत्वावर टीका
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. मंत्रीपद न मिळाल्याची खदखद आणि पक्षातील इनकमिंगवर त्यांनी बोट ठेवले. भाजपने शनिशिंगणापूरप्रमाणे दरवाजे उघडे ठेवल्याने कोणीही येत असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे विदर्भातील भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला आहे. नगरपरिषदेतील पराभवानंतर त्यांनी भाजपमधील इनकमिंग धोरणावर आणि मंत्रीपद न मिळाल्याच्या नाराजीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मुनगंटीवार यांनी भाजपची तुलना शनिशिंगणापूरशी करत म्हटले की, “शनि शिंगणापूर नंतर आमचा एकमेव पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवलेला नाही. कोणीही येतो.” चंद्रपूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी ७ ठिकाणी काँग्रेसचे, एका ठिकाणी शिंदे गटाचे, एका ठिकाणी अपक्ष आणि केवळ दोन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना मुनगंटीवार यांनी पक्षात बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यावर बोट ठेवले. त्यांच्या मते, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्याचा परिणाम मतदारांवर झाला आहे. माजी आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजपमधील प्रवेशाला आपला विरोध असतानाही तो डावलण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
