Sudhir Mungantiwar यांच्याकडून महाराष्ट्र निर्बंधमुक्तीचं स्वागत
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारनं निर्बंध मुक्तीचं स्वागत केलं आहे. मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारचं अभिनंदन केलं आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारनं निर्बंध मुक्तीचं स्वागत केलं आहे. मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारचं अभिनंदन केलं आहे. आनंद देखील कोरोना काळात एकट्यानं साजरा करावा लागत होता. कोरोनाचे निर्बंध मुक्त झाल्यामुळं गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी उत्साहात साजरी करता येईल. मात्र, राज्य सरकारनं सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर द्यावा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
