Sunil Raut | संजय राऊतांची कोठडी वाढवण्यामागे केसरकरांचा हात असावा
गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. सध्या राऊत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुंबई : दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्या केसचा प्रचंड अभ्यास केला आहे. संजय राऊत यांची कोठडी वाढवण्यामध्ये व जेलमध्ये टाकण्यामध्ये केसर करांचा हात असावा, असा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. सध्या राऊत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांना आधी दोन वेळा 4-4 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायलयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली.
Published on: Aug 14, 2022 01:01 AM
