घाडगेंना मारहाण करायला तटकरेंनी सांगितलं? रमेश पाटील आणि तटकरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

घाडगेंना मारहाण करायला तटकरेंनी सांगितलं? रमेश पाटील आणि तटकरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Jul 23, 2025 | 8:58 AM

खासदार सुनील तटकरे आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे.

खासदार सुनील तटकरे आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. तुम्ही सुरज चव्हाणला विजयकुमार घाडगेंना मारहाण करायला लावली का? असा सवाल रमेश पाटलांनी तटकरे यांना केला आहे. तर अशा गोष्टी मी कधीही करत नाही, असं तटकरे यांनी रमेश पाटलांना सांगितलं आहे. त्यांच्या या फोन वरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतं आहे. दरम्यान, टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

2 दिवसांपूर्वी लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत तटकरे यांच्या अंगावर पत्ते फेकले होते. त्यानंतर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलकांना जबर मारहाण केली होती. यात सूरज चव्हाण यांचा देखील समावेश होता. त्यानंतर ही मारहाण खुद्द सुनील तटकरे यांनी करायला लावल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याने त्याच पार्श्वभूमीवर आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Published on: Jul 23, 2025 08:57 AM