SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 6 November 2021

| Updated on: Nov 06, 2021 | 8:44 AM

सध्या जिकडे तिकडे दिवाळी पहाट कार्यक्रमांची मेजवानी सुरु आहे. रसिक प्रेक्षक जादुई स्वरात न्हाऊन निघतायत. जळगावातल्या एका कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गायली. आपल्या भाषणाला आक्रमकपणाची जोड देऊन विरोधकांना अंगावर घेणारे हे तेच गुलाबराव पाटील आहेत का? असा प्रश्न पडवा इतकी छान कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायली.

Follow us on

शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपण सभा गाजवणारे नेते म्हणून ओळखतो. त्यांनी मंचावर उभं राहावं आणि हजारो-लाखोंची सभा गाजवावी, हे गेली कित्येक वर्षांचं समीकरण. आक्रमकपणा ही त्यांची ओळख… पण हेच गुलाबराव पाटील जेव्हा रंगात येतात, तेव्हा त्यांच्या तोंडून कव्वाली निघते… चढता सुरज धीरे धीरे ही अजीज नाझा यांची अजरामर कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायली.

सध्या जिकडे तिकडे दिवाळी पहाट कार्यक्रमांची मेजवानी सुरु आहे. रसिक प्रेक्षक जादुई स्वरात न्हाऊन निघतायत. जळगावातल्या एका कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गायली. आपल्या भाषणाला आक्रमकपणाची जोड देऊन विरोधकांना अंगावर घेणारे हे तेच गुलाबराव पाटील आहेत का? असा प्रश्न पडवा इतकी छान कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायली.

राजकीय नेत्यांना त्यांच्या राजकीय जीवनातून त्यांच्या छंदासाठी वेळ काढणं मुश्किल होऊन जातं. विधिमंडळ अधिवेशन, सभा, दौरे, विविध कार्यक्रम, भेटी गाठींमुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या छंदासाठी वेळ देता येत नाही. पण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात असे काही नेतेमंडळी आहेत, जे नियमित त्यांच्या छंदासाठी वेळ काढतात. ठाकरे-गडकरी-पवार यांच्यानंतर आता गुलाबराव पाटील यांचं नाव घ्यावं लागेल.

कारण गुलाबराव पाटील यांना मराठी सिनेमा, नाटक, गीत-संगीत ऐकण्याचा छंद आहे. आपल्या कारने प्रवास करताना नेहमी ते जुनी गाणी ऐकत असतात. कव्वाली त्यांना अतिशय जवळची… अल्ताफ राजा, नुसरत फतेह अली खान यांच्या कव्वाली गुलाबराव पाटील नेहमी ऐकत असतात.