Shiv Sena Symbol Dispute : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी, आतपर्यंत काय-काय झालं?
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणांवर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी अपेक्षित आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह धनुष्यबाण आणि आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
तर ठाकरे गटाचा आरोप आहे की, निवडणूक आयोगाचा हा निर्णय असंविधानिक आणि पक्षपाती आहे. या प्रकरणात ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. यापूर्वी कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले होते. आता सुप्रीम कोर्टात पक्षचिन्हाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते सुप्रिया सुळे, अनिल देसाई, अनिल परब हे सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत.
