मध्यरात्री शरण आले, पहाटे जामीनही मिळाला; सुरज चव्हाणांना पोलिसांचं पाठबळ?

मध्यरात्री शरण आले, पहाटे जामीनही मिळाला; सुरज चव्हाणांना पोलिसांचं पाठबळ?

| Updated on: Jul 23, 2025 | 1:31 PM

सुरज चव्हाण पोलिसांना शरण आले असून त्यांचा जामीन देखील मंजूर झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्य पदाचा राजीनामा घेतल्यानंतर आता सुरज चव्हाण पोलिसांना शरण आले आहे. त्यानंतर आता त्यांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.

लातूरमध्ये फरार असलेले सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांना काल रात्री शरण गेले. सूरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पहाटेच्या सुमारास त्याला जामीन मंजूर झाला. पोलिसांनी याबाबत अत्यंत गुप्तता पाळत सूरज चव्हाणला पाठबळ दिल्याचे दिसून आले. रात्री पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यांचा जबाब नोंदवून त्याला सोडण्यात आले. या घटनेमुळे शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला असून, यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 23, 2025 01:31 PM