Walmik Karad : अण्णा बाहेर येताच… कराडच्या जिवलग माणसाकडून धस, आव्हाडांसह बाळा बांगरांना शिव्या अन् उघड धमकी, VIDEO समोर

Walmik Karad : अण्णा बाहेर येताच… कराडच्या जिवलग माणसाकडून धस, आव्हाडांसह बाळा बांगरांना शिव्या अन् उघड धमकी, VIDEO समोर

| Updated on: Jul 21, 2025 | 6:09 PM

वाल्मिक कराडचा जवळचा सहकारी संदीप तांदळे या व्यक्तीने व्हिडीओ करत आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिवीगाळ केली आहे.

बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे. मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडचा जवळचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आहे. संदीप तांदळे नावाच्या वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यानं आपला एक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. संदीप तांदळेने आपल्या व्हिडीओमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि बीडमधील बाळा बांगर उर्फ विजयसिंह बांगर यांना अश्लील शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळत आहे. आण्णा बाहेर आल्यानंतर सर्वांनाच बघणार अशी उघड धमकी देखील या व्यक्तीनं या व्हिडीओमध्ये दिली आहे. व्हिडीओमधून धमकी देणारा संदीप तांदळे हा बीडमधील सराईत गुन्हेगार असून तो वाल्मिक कराडचा समर्थक आणि जवळचा सहकारी आहे. संदीप तांदळेने 307 च्या कलमांतर्गत तीन केसेस बाळा बांगर यांच्यावर दाखल केल्या होत्या. त्याच्यावर खंडणी, पोक्सो अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

Published on: Jul 21, 2025 06:09 PM