Special Report | ‘धोका दिल्यानं शिवसेना फोडली’!-TV9

| Updated on: Aug 10, 2022 | 10:03 PM

शरद पवारांनीही भाजपवर शिवसेनेला हळूहळू संपवल्याचा आरोप केला.  सुशील कुमारांच्या वक्तव्यानंतर, महाराष्ट्रातले भाजपचे नेते बॅकफूटवर गेलेले नाहीत..स्वत: फडणवीस असो की आशिष शेलार, यांनी उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलंय.

Follow us on

बिहारचे भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींच्या याच वक्तव्यानं, महाराष्ट्रात शिवसेनेसह महाविकास आघाडीला बोलण्याची संधी मिळालीय. 2019च्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपला धोका दिला, त्यामुळं शिवसेनेला आम्हीच फोडलं, असं जाहीरपणे सुशील कुमार मोदी म्हणालेत. शिंदेंच्या बंडानं शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार करत शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमारांनीही भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप केला. आणि भाजपसोबत आघाडी तोडत आरजेडीशी सत्ता स्थापन केली. त्याचवेळी भाजपच्या सुशील मोदींनी नितीश कुमारांना इशारा देताना शिवसेनेला फोडण्याचं उदाहरण दिलं..यानंतर शरद पवारांनीही भाजपवर शिवसेनेला हळूहळू संपवल्याचा आरोप केला.  सुशील कुमारांच्या वक्तव्यानंतर, महाराष्ट्रातले भाजपचे नेते बॅकफूटवर गेलेले नाहीत..स्वत: फडणवीस असो की आशिष शेलार, यांनी उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलंय.