Sushma Andhare : फडणवीस पक्ष फोडतात अन् डायरेक्ट… अंधारे यांची बोचरी टीका, म्हणाल्या शिंदे एकांतात नक्कीच…

Sushma Andhare : फडणवीस पक्ष फोडतात अन् डायरेक्ट… अंधारे यांची बोचरी टीका, म्हणाल्या शिंदे एकांतात नक्कीच…

| Updated on: Nov 26, 2025 | 3:46 PM

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उदय सामंत यांची उपमुख्यमंत्रीपदाची कथित महत्त्वाकांक्षा, गुलाबराव पाटलांचे माल संदर्भातील विधान, तसेच भाजपची पक्ष फोडण्याची रणनीती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यावर त्यांनी टीका केली. हिंदुत्व हा भाजपसाठी श्रद्धेचा विषय नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

इगतपुरी येथे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचा पॅटर्न पक्ष वाढवण्याऐवजी पक्ष फोडण्याचा आणि माणसे चोरण्याचा असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे गटही एकांतात या गोष्टीचा स्वीकार करत असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्यांच्या कथित उपमुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षा आणि वारंवार बदललेल्या निष्ठांवरून त्यांनी टीका केली. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीवरून त्यांनी शिंदे गट आणि उदय सामंत यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला.

गुलाबराव पाटील यांच्या नगर विकास खात्यात भरपूर माल आहे, या विधानावर बोलताना अंधारे यांनी, माणसे भावनेच्या भरात खरं बोलून जातात, असे म्हटले. समृद्धी महामार्गातील सचिन जोशी आणि सुमित फॅसिलिटेटर कंपनीच्या ठेक्यावरूनही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपच्या पीए संस्कृतीवर टीका करताना, भाजप बाहेरून आलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पक्षात घेत असल्याचा दावा त्यांनी केला.

Published on: Nov 26, 2025 03:46 PM