Sushma Andhare : दोन पक्षाचे मनोमिलन हे भाजपला पचलेले नाही; सुषमा अंधारेंची टीका

Sushma Andhare : दोन पक्षाचे मनोमिलन हे भाजपला पचलेले नाही; सुषमा अंधारेंची टीका

| Updated on: Jun 27, 2025 | 1:38 PM

Sushma Andhare Slams BJP : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधु आक्रमक झालेले असतानाच सुषमा अंधारे यांनी देखील भाजपवर टीका केली आहे.

दोन पक्षाचे मनोमिलन भाजपला पचलेले नाही, असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चा काढण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढणार आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

यावेळी पुढे बोलताना त्य म्हणाल्या की, मनसे प्रमुख राज ठाकरे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना ताज हॉटेलमध्ये भेटतात तेव्हा राज ठाकरे हे त्यांना फार चांगले वाटत असतात. पण तेच जेव्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोर्चा काढायची भाषा केली की भाजपला अतिशय विपरीत विधाने सुचायला लागतात. या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षाचे मनोमिलन हे भाजपला पचलेले नाही. ही माणसे मराठीवर, मराठी माणसावर सूड उगवणारी माणसं आहेत, अशीही टीका अंधारे यांनी केली आहे.

Published on: Jun 27, 2025 01:35 PM