‘ना जबरदस्ती ना धक्काबुक्की… दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध’, पुणे बलात्कार प्रकणातील आरोपीच्या वकिलाचा खळबळजनक दावा

‘ना जबरदस्ती ना धक्काबुक्की… दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध’, पुणे बलात्कार प्रकणातील आरोपीच्या वकिलाचा खळबळजनक दावा

| Updated on: Mar 01, 2025 | 12:32 PM

एसटीमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यांना 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपीच्या वकिलांनी आता युक्तिवाद करताना एक वेगळाच दावा केला आहे.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील एसटीत तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुणे सेशन कोर्टात पोलिसांनी गाडेला हजर केलं. मात्र कोर्टात आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वेगळाच दावा केला. ‘दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या आधी तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसत आहे. कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की झालेली दिसत नाही. दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले. कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती झालेली नाही’, असं आरोपीच्या वकिलाने म्हटलंय. तर दुसरीकडे तपास अधिकारी युवराज नांदरे यांनी कोर्टात घटनेची माहिती देताना म्हटले की, ‘ताई म्हणून हाक मारत मी 15 वर्षे कंडक्टर म्हणून काम करतो. तुमच्या गावी जाणारी बस दुसरीकडे लागलेली आहे असं सांगितलं. ताई बोलून आरोपीने पिडीतेचा विश्वास संपादन केला. पिडीतेला बसमध्ये चढवून दार बंद केलं. आणि गळा दाबून आरोपीने दोन वेळा पिडीतेवर अत्याचार केले. आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी भलताच दावा केला. आता 12 मार्चपर्यंत आरोपी गाडे हा पोलिसांच्या कोठडीत असणार आहे, त्यामुळे पोलिसांकडून खोलवर तपास करण्यात येणार आहे.

Published on: Mar 01, 2025 11:08 AM