Tapovan Tree Felling: तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी? मंत्री महाजनांचं अजब विधान
नाशिकच्या तपोवनात कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. सरकारने डॅमेज कंट्रोल म्हणून हजारो झाडे लावण्याची घोषणा केली असली, तरी पर्यावरणप्रेमी यास विरोध करत आहेत. या वादामुळे नाशिक शहराच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का लागत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून तीव्र नाराजी समोर आल्यानंतर सरकारने डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू केली आहे. कुंभमेळा 2026 च्या तयारीसाठी तपोवनातील शेकडो झाडे हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, हटवल्या जाणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात नाशिकमध्ये 1000 नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. मागील पुनर्रोपण मोहिमेमध्ये 60 ते 70% झाडे जगल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत आकडेवारी अजून समोर आलेली नाही. पर्यावरणप्रेमींनी साधूंसाठी तात्पुरत्या राहुट्यांसाठी झाडांची कत्तल का, असा प्रश्न उपस्थित करत एकाही झाडाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या वादामुळे नाशिकची बदनामी होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
Published on: Dec 16, 2025 10:53 AM
