Team India Victory Parade : गर्दी नव्हे हे तर क्रिकेटचे दर्दी… मुंबईत क्रिकेटप्रेमींचा जनसागर,

Team India Victory Parade : गर्दी नव्हे हे तर क्रिकेटचे दर्दी… मुंबईत क्रिकेटप्रेमींचा जनसागर,

| Updated on: Jul 04, 2024 | 5:44 PM

टीम इंडियाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून येणाऱ्या रोहित शर्माच्या शिलेदारांची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहता आहेत. विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे

अवघ्या काही क्षणात टी-२० विश्वविजेता संघ मुंबईत दाखल होणार आहे. या विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून येणाऱ्या रोहित शर्माच्या शिलेदारांची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहता आहेत. विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. असंख्य क्रिकेटप्रेमी मुंबईतील रस्त्यावर उतरल्यानं सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे. टीम इंडियासाठी दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू असल्याचे मुंबईकरांचं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे.

Published on: Jul 04, 2024 05:44 PM