Tejasvee Ghosalkar Joins BJP : खूप गोष्टी बोलू शकत नाही… तेजस्वी घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला धक्का

| Updated on: Dec 16, 2025 | 11:05 AM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी हा निर्णय कठीण असल्याचे म्हटले. त्यांच्या प्रभागातील ओबीसी आरक्षणामुळे तसेच राजकीय नाराजीमुळे हा प्रवेश झाल्याची चर्चा आहे, ज्यामुळे मुंबईतील राजकारण तापले आहे.

मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होण्याच्या काही तास आधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. या पक्षप्रवेशामुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी या निर्णयाबाबत बोलताना सांगितले की, हा निर्णय खूप कठीण होता, मात्र प्रभागातील विकासकामे करण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला आहे. तसेच, अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल मी आत्ता बोलू शकत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. त्यांच्या पतीने, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आणि त्यानंतर मुंबई बँकेत त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मुंबई महापालिकेतील त्यांचा प्रभाग क्र. १ ओबीसींसाठी राखीव झाल्याने, त्यांना येथून लढणे अशक्य झाले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना शेजारच्या वॉर्ड क्र. २ मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Dec 16, 2025 11:05 AM