Tesla in Mumbai : टेस्लाची भारतात दमदार एन्ट्री, मुंबईतील पहिल्या शोरूमची पाटी मराठीत, पाहताच तुम्ही म्हणाल…

Tesla in Mumbai : टेस्लाची भारतात दमदार एन्ट्री, मुंबईतील पहिल्या शोरूमची पाटी मराठीत, पाहताच तुम्ही म्हणाल…

| Updated on: Jul 15, 2025 | 12:07 PM

इलॉन मस्कची जगप्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’ने आज भारतात आपली धमाकेदार एन्ट्री केली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या पॉश एरियात टेस्ला कंपनीचं पहिलं शोरुम सुरू होत आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर इलॉन मस्कची जगप्रसिद्ध कंपनी ‘टेस्ला’ शोरूमची आज मुंबईत एन्ट्री झाली. कंपनीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये ४००० चौरस फूट जागा ५ वर्षांसाठी भाड्याने घेतली असून मुंबईनंतर दुसरं शोरूम दिल्लीत उघडण्याचं कंपनीचं नियोजन आहे. दरम्यान, आज मंगळवारी १५ जुलै रोजी मुंबईत या कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरुमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते पार पडतंय. दरम्यान, आज याच ठिकाणी एक वेगळेपण पाहायला मिळालं ते म्हणजे भारतातील टेस्लाच्या पहिल्या शोरुमची पाटी मराठीत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या शोरुमची पाटी मराठी असल्याने टेस्लाकडून महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन करण्यात आल्याचे आवर्जून पाहायला मिळाले.

शोरुममध्ये टेस्लाचे अनेक भन्नाट मॉडेल्स उपलब्ध असणार असून यामध्ये टेस्लाच्या मॉडेल ३, मॉडेल वाय आणि मॉडेल एक्सची झलक पाहता येणार आहे. तर या शोरूमला भेट देणाऱ्यांना टेस्लाच्या खास वैशिष्ट्यांबद्दल आणि तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्याची संधीही मिळणार आहे. 

Published on: Jul 15, 2025 12:06 PM