Thackeray Brothers : एकत्र येण्यावरून ठाकरे बंधूंचं ठरलं… 5 जुलैला एकाच मंचावर अन्… विजयी मेळाव्याच्या माध्यमातून नेमके संकेत काय?

Thackeray Brothers : एकत्र येण्यावरून ठाकरे बंधूंचं ठरलं… 5 जुलैला एकाच मंचावर अन्… विजयी मेळाव्याच्या माध्यमातून नेमके संकेत काय?

| Updated on: Jul 02, 2025 | 8:24 AM

5 तारखेला उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही एकाच मंचावर येणार आहेत. मोठ्या संख्येने हजर राहा असं आवाहन करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून एकच पत्रक काढण्यात आला आहे. तर टायगर अभी जिंदा है म्हणत संजय राऊतांनी सरकारला डिवचलंय.

पाच तारखेला मुंबईच्या वरळी डोम इथ ठाकरे बंधूंचा एकत्र मेळावा होणार आहे. त्यासाठी मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्रित पत्रक काढलंय. आवाज मराठीचा वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाळ उधळत या. आम्ही वाट बघतोय. तर संजय राऊतांनी ही ट्वीट करत ठाकरे येत आहेत असं म्हटलंय. पहिलीपासून हिंदीच्या सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकवटले. पाच तारखेला मोर्चासही ठरलं पण मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीचे जीआर रद्द केले. मात्र तरीही ठाकरेंनी विजयी मेळावा घेण्याचं ठरवून राजकीय दृष्ट्याही सोबत येण्याचे संकेत दिले. त्यामुळे नारायण राणे यांनी भाऊबंदकी आताच कशी आठवली असा सवाल करत उद्धव ठाकरेवर टीकास्र डागलाय. ‘उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नातेने परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत. याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं त्रास दिला पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं त्याची यांना जाणीव वाटत नाही आणि आता लाळ का ओकत आहात ?’, असा सवाल राणेंनी केलाय. यानंतर भास्कर जाधवांनी देखील नारायण राणेंना घेरल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jul 02, 2025 08:24 AM