Satyacha Morcha : मतदानासाठी दुबार मतदार दिसले तर फोडून काढा, मतचोरीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक
सत्याच्या मोर्चात राज आणि उद्धव ठाकरे यांनी मतदारांना दुबार व बनावट मतदारांना शोधून काढण्याचे आणि पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक याद्यांची काटेकोरपणे तपासणी करण्यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्रातील मतचोरीच्या गंभीर प्रकारांवर पुरावे सादर करत, त्यांनी प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी हे आवश्यक असल्याचे म्हटले.
महाराष्ट्रात निवडणुकीतील गैरव्यवहारांविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दुबार मतदारांना रोखण्यासाठी मतदारांना आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी, दुबार मतदार आढळल्यास त्यांना “फोडून काढा आणि पोलिसांत द्या” असे म्हटले, तर उद्धव ठाकरे यांनीही “मतचोरी दिसेल तिथे फटकावा” असा सल्ला दिला.
या नेत्यांनी मतदारांना घरोघरी जाऊन याद्या तपासण्याचे आणि दुबार मतदारांचे चेहरे ओळखून त्यांना मतदान केंद्रांवर अडवण्याचे निर्देश दिले. याशिवाय, असे मतदार आढळल्यास त्यांना फटकावून करून पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगितले, जेणेकरून महाराष्ट्रातील सध्याचा कारभार योग्य मार्गावर येईल. लोकशाही मार्गानेच आंदोलन केले जाईल, मात्र कायद्याचा गैरवापर झाल्यास जनता सक्षम आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Published on: Nov 01, 2025 04:35 PM
