राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग! ठाकरे बंधुची भेट; राज ठाकरे मातोश्रीवर

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग! ठाकरे बंधुची भेट; राज ठाकरे मातोश्रीवर

| Updated on: Oct 12, 2025 | 1:18 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी निघाले आहेत. स्नेहभोजनाच्या निमित्ताने होणाऱ्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी अनेकांची अपेक्षा आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही भेट केवळ कौटुंबिक नसून यातून मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरे यांचा ताफा माहीममधून मातोश्रीकडे निघाला असून, काही वेळातच ते पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी गेले होते. संजय राऊत यांनी नुकतीच माहिती दिली होती की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला देखील जाणार आहेत. आजच्या भेटीत राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता असून, अनेक वर्षांपासूनच्या भेटीगाठींचे रूपांतर युतीमध्ये होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Published on: Oct 12, 2025 01:18 PM