Raj-Udhhav Thackeray Melava : विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंची एकत्र राहण्याची मोठी घोषणा

Raj-Udhhav Thackeray Melava : विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंची एकत्र राहण्याची मोठी घोषणा

| Updated on: Jul 05, 2025 | 5:36 PM

Thackeray Brothers Vijay Melava Updates : हिंदी सक्तीच्या जीआर रद्द झाल्याच्या मुद्द्यावर आज ठाकरे बंधूंनी एकत्र मेळावा घेतला. त्यात युतीबाबत मोठी घोषणा करण्यात आली.

विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूंनी आज एकत्र राहण्याची घोषणा केली आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार व्हावं असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हंटलं. तर आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. त्यामुळे ही ठाकरे बंधूंच्या युतीची सुरुवात आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पुढे काय गोष्टी घडतील सांगता येत नाही, पण ही मराठीची एकजूट अशीच कायम रहावी. महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं ही अपेक्षा, इच्छा व्यक्त करतो, असं राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शेवटी म्हंटलं. तर आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं. त्यामुळे आता हे एकत्र राहण्याचं विधान म्हणजे युतीची सुरुवात म्हणायची का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.

Published on: Jul 05, 2025 05:36 PM