BMC Election 2025 : मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली, नेमकी काय स्ट्रेटजी?

BMC Election 2025 : मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली, नेमकी काय स्ट्रेटजी?

| Updated on: Dec 20, 2025 | 1:47 PM

राज आणि उद्धव ठाकरे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी रणनीती आखत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील २२७ वॉर्डांपैकी ४१ वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, तर ७२ वॉर्डांमध्ये मराठी मतदारांचे वर्चस्व आहे. ठाकरे बंधू जागावाटपाचे सूत्र ठरवताना या मराठी-मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज आणि उद्धव ठाकरे आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मराठी आणि मुस्लिम मतदारांना लक्ष्य करून रणनीती आखत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील २२७ वॉर्डांपैकी ४१ वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, तर ७२ वॉर्डांमध्ये मराठी मतदारांचे वर्चस्व आहे. ठाकरे बंधू जागावाटपाचे सूत्र ठरवताना या मराठी-मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या जागावाटपावरून ठाकरे बंधूंमध्ये सध्या पेच निर्माण झाला आहे. मनसेने ठाकरे सेनेच्या चार आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील वॉर्डांवर दावा केला आहे. वरळी, दादर-माहीम, शिवडी आणि विक्रोळी या मतदारसंघांमधील जागा मिळाव्यात अशी मनसेची आग्रही मागणी आहे. या जागांवर एकमत करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र चर्चा करणार आहेत. सध्या ठाकरे सेना १४० ते १५० जागांवर तयारी करत असून, मनसेला जवळपास ६० ते ७० जागा मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत जागावाटप पूर्ण करून ठाकरे सेना आणि मनसे युतीचा मुहूर्त साधणार असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Dec 20, 2025 01:45 PM