Thackeray Brothers : हिंदीचा GR रद्द आता ठाकरे बंधूंचं ठरलं… 5 जुलैला एकत्र विजयी मेळावा, ठिकाणं कोणतं?
मनसे आणि उद्धव ठाकरे गटाकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर अखेर सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करावा लागला. यानंतर दोन्ही ठाकरे बंधू विजयी मेळाव्यात एकत्र येणार असल्याची चर्चा होतेय.
हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंचं एकत्र येण्यासंदर्भात ठरलंय. येत्या पाच जुलैल्या एकत्रित रित्या विजयी मेळावा निघणार असल्याचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलंय. हिंदी सक्ती संदर्भातील जीआर रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपला निर्धार कायम ठेवत एकजूट कायम ठेवली पाहिजे असं म्हटलं तर ५ जुलैला विजयी मेळावा निघणार असल्याची घोषणा केली. यानंतर मसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संदर्भात भाष्य केले. ५ जुलैला विजयी मेळावा होणार पण तो कोणताही पक्षाचा नसेल. या मेळाव्यात पक्षीय लेबल नसेल. मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, केवळ मराठी हा अजेंडा असणार आहे. दरम्यान, मेळाव्याच्या स्थळाबाबत आम्ही चर्चा करू असं राज ठाकरे म्हणालेत.
Published on: Jun 30, 2025 01:12 PM
