Thackeray Brothers : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. त्यातच आता ठाण्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. ठाण्याच्या पडवळनगर भागात लावण्यात आलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी चर्चा होत होती. मात्र आता थेट एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी केली जात आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक भावनिक फोटो असून ‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र!’ असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे.
Published on: Apr 20, 2025 10:34 AM
