Thackeray Breaking : बाळासाहेबांची गर्जना घुमली, त्याच शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा विजय मेळावा?
Thackeray Brothers News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत 5 जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याचे ठिकाण ठरलेले आहे.
निवृत्ती बाबर, प्रतिनिधी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत 5 जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याचे ठिकाण ठरलेले आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्कात हा ऐतिहासिक मेळावा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचं देखील बोललं जात आहे. तर मेळाव्यासाठी वरळी डोम आणि गोरेगाव नेस्को सेंटरची देखील चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा मेळावा आता नेमका कुठे होतो ही पाहणं महत्वाचं ठरेल.
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा जीआर काल सरकारकडून रद्द करण्यात आलेला आहे. ठाकरे बंधूंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारने हा जीआर मागे घेतला आहे. त्यामुळे 5 जुलैला निघणाऱ्या मोर्चा ऐवजी आता ठाकरेंकडून विजय मेळावा घेतला जाणार आहे. हा विजय मेळावा जिथे बाळासाहेब ठाकरेंचा आवाज घुमला त्याच शिवाजी पर्कात घेतला जाण्याची शक्यता आहे.
