Special Report | परमबीर सिंहांबाबत ठाकरे सरकार इन अॅक्शन

| Updated on: Oct 20, 2021 | 9:45 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही.

Follow us on

YouTube video player

मुंबई : परमबीर सिंह यांच्या अटकेच्या शक्यतेवरुन अस्पष्टता दिसत आहे. सिंह यांच्या अटकेवरुन शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे. परमबीर सिंह कुठे आहेत हे माहिती नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. परमबीर सिंह यांना अटक करणार नाही, याबाबत शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय. परमबीर सिंह कुठे आहेत माहिती नाही. ते समन्सना उत्तर देत नाहीत, असंही सरकारनं म्हटलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं हायकोर्टात म्हटलंय. अॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं त्याला सिंह यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली आहे. मात्र, यापूर्वी परमवीर सिंह यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना अटक करणार नाही असं राज्य सराकरनं कोर्टात म्हटलं होतं. पण आजच्या सुनावणीवेळी हा शब्द आम्ही पुढे नेऊ शकणार नाही, कारण ते कुठे आहेत याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही. ते कुठल्याही समन्सला उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारनं म्हटलंय.