महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, मुंबईतील महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, मुंबईतील महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार

| Updated on: Jan 27, 2025 | 5:34 PM

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील एका महिला नेत्याने ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आज संध्याकाळी 5.30 वाजता ठाण्यात त्या पक्षप्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे. राजुल पटेल या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक आहेत. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र विधानसभा निवडणुकीला वर्सोवा मतदारसंघातून राजुल पटेल यांच्या ऐवजी हारून खान यांना उमेदवारी मिळाली होती. तर हारून खान यांना उमेदवारी मिळाल्याने राजुल पटेल या नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. राजुल पटेल या माजी नगरसेविका म्हणून ठाकरे शिवसेनेत कार्यरत होत्या. तर जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. मात्र आता ते ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊन धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Jan 27, 2025 05:34 PM