Vasant More Video : पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले, म्हणाले…

Vasant More Video : पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले, म्हणाले…

| Updated on: Mar 08, 2025 | 1:55 PM

पुण्यात आज पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर आता मद्यधुंद अवस्थेतील तरूणाने महिलांसमोरच अश्लील चाळे केले

मद्यधुंद अवस्थेतील तरूणाने पुण्यातील शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सर्वत्र महिला दिन साजरा केला जात असताना एका तरूणाने सिग्नलवरच स्त्रियांसमोर अश्लील चाळे केले आहे. या तरूणाने महागड्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून हे अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी एक बलात्काराची घटना घडली तिथेच हा प्रकार घडलाय. सातत्याने अशा घटना घडत असताना पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. पोलीस विनाकारण गाड्यांना अडवताना दिसतात, मग गाड्यांच्या काचा काळ्या असो किंवा फॅन्सी नंबर प्लेट असो… मग त्यांना या गोष्टी दिसत नाही. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे पुण्यातील वातावरण खराब होत आहे. पोलीस त्यांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या मागे आहेत. त्यामुळे अशा संतापजनक घडना घडत आहेत’, असं नेते वसंत मोरे म्हणाले. तर ‘ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे मुख्य ऑफिस आहे तिथेच अशा गोष्टी वारंवार घडताय तर तिथले पोलीस कर्मचारी काय करताय?’, असा सवालही उपस्थित होतोय.

Published on: Mar 08, 2025 01:55 PM