Uddhav Thackeray Sena : ठाकरेंचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला; केली मोठी मागणी

Uddhav Thackeray Sena : ठाकरेंचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला; केली मोठी मागणी

| Updated on: Jun 30, 2025 | 1:56 PM

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले आहेत.

ठाकरेंचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले आहेत. आज महाविकास आघाडीची सुद्धा विरोधी पक्षनेते पदाच्या चर्चे संदर्भात बैठक होणार आहे. तर दुसरीकडे ठाकरेंचे आमदार  विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या चर्चेसाठी ही भेट झाली का? असं देखील प्रश्न आता उपस्थित होतं आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. विविध मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. मात्र त्या आधीच ठाकरेंच्या सेनेचे आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनात पोहोचले आहेत. आम्हाला नवीन पक्ष कार्यालय देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी पहिल्या अधिवेशनतच ठाकरेंच्या आमदारांनी या मागणीचं पत्र दिलं होतं. मात्र अद्यापही कार्यालय मिळालेलं नसल्याने आज आमदारांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे.

Published on: Jun 30, 2025 01:55 PM