Thackeray MNS Alliance : मुंबईत ठाकरेंचा उत्सव, धुमधडाक्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार, राऊतांकडून मोठी अपडेट
पालिका निवडणुकांसाठी ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देतील. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, शिवडीतील जागांचा वादही मिटल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या युतीची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेऊन या युतीची माहिती देणार आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही युती होत असल्याचे मानले जात आहे. जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, राज ठाकरे यांनी याबाबतच्या चर्चा जास्त ताणू नयेत अशा सूचना दिल्या आहेत.
या युतीसाठी संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात तीन बैठका झाल्याची माहिती आहे. शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये वीस मिनिटांची चर्चाही झाली होती. तसेच राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांमध्येही सकारात्मक चर्चा पार पडली होती. मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली, ज्यात शिवडीतील प्रभाग क्रमांक २०३, २०४ आणि २०५ च्या जागेवरून सुरू असलेला वाद मिटवण्यात आला. त्यानुसार, एक जागा मनसेला तर उर्वरित दोन जागा ठाकरे सेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे सेनेकडून पक्षाचे सचिव आणि स्थानिक नेते सुधीर साळवी या बैठकीत उपस्थित होते.
