अन् एकनाथ शिंदे सुसाट धावले! शिंदेंचा हा व्हिडीओ पाहिला का?

अन् एकनाथ शिंदे सुसाट धावले! शिंदेंचा हा व्हिडीओ पाहिला का?

| Updated on: Aug 10, 2025 | 12:23 PM

ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या वर्षा मॅरेथॉनचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या वर्षा मॅरेथॉनचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ही मॅरेथॉन यंदा 31 व्या वर्षात पदार्पण करत असून, ठाणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या मॅरेथॉनच्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते. शिंदे यांच्या हस्ते 21 किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ देण्यात आला. या स्पर्धेत अनेक धावपटूंनी सहभाग घेतला असून, त्यांच्या उत्साहामुळे ठाण्याच्या रस्त्यांवर उर्जेचा संचार झाला. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. त्यांच्या धावण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Published on: Aug 10, 2025 12:23 PM