Thane : लाथा-बुक्क्या अन्… ठाण्यात भाजप-सेनेत तुफान राडा, BJP माजी नगरसेवकानं शिंदे शाखा प्रमुखांच्या लगावली कानाखाली, घडलं काय?

Thane : लाथा-बुक्क्या अन्… ठाण्यात भाजप-सेनेत तुफान राडा, BJP माजी नगरसेवकानं शिंदे शाखा प्रमुखांच्या लगावली कानाखाली, घडलं काय?

| Updated on: Nov 21, 2025 | 11:49 AM

ठाण्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये एका योजनेच्या श्रेयवादावरून जोरदार राडा झाला. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शाखाप्रमुख हरेश महाडिक यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

ठाण्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये एका सरकारी योजनेच्या श्रेयवादावरून मोठा वाद उफाळून आला आहे. नौपाडा परिसरातील टेकडी बंगलो येथील लक्ष्मी निवास गृहनिर्माण संस्थेत (बीएसयुपी अंतर्गत) १०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी नोंदणी आदेशाबाबत जल्लोष सुरू असताना हा प्रकार घडला. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख हरेश महाडिक यांना मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

हरेश महाडिक यांच्या म्हणण्यानुसार, काल शासनाने १०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी नोंदणीचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला होता, ज्यामुळे गोरगरिबांना स्वतःच्या नावावर सदनिका होण्याचा मार्ग सुकर झाला होता. या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी सोसायटीमधील सदस्य आणि महिला वर्ग एकत्र आले होते. त्यावेळी स्थानिक भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार घटनास्थळी आले आणि आम्ही बिल्डिंग बांधली, तुम्ही श्रेय का घेता? असे म्हणत वाद घालू लागले. महाडिक यांनी सांगितले की, पवार यांनी त्यांच्या जवळील एका विभागप्रमुखाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनाही मारले. ‘तुम्ही नगरसेवक आहात, प्रेमाने बोलायला तयार आहोत, पण मारामारी करणे योग्य नाही,’ असे महाडिक म्हणाले. या घटनेनंतर परिसरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटली आहे.

Published on: Nov 21, 2025 11:49 AM