ठाण्यात शिंदेच्या उमेदवाराच्या वडिलांची गुंडगिरी! व्हिडीओ आला समोर

ठाण्यात शिंदेच्या उमेदवाराच्या वडिलांची गुंडगिरी! व्हिडीओ आला समोर

| Updated on: Jan 11, 2026 | 10:17 AM

ठाण्यातील गांधीनगर परिसरातील पुनर्वसन प्रकल्प बाधितांना शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराच्या वडिलांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. घरभाडे मागितल्यानंतर हा प्रकार घडला. तसेच, शिंदे सेनेच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांनी मतदाराला अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ठाण्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांशी संबंधित दोन घटनांमुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. पहिली घटना गांधीनगर परिसरातील पुनर्वसन प्रकल्पात घडली. शिंदे सेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांचे वडील, माजी नगरसेवक संजय पांडे यांच्यावर पुनर्वसन प्रकल्पातील बाधितांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. अनेक वर्षांपासून अडकलेल्या या प्रकल्पातील नागरिकांनी घरभाडे मागितल्यानंतर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दुसऱ्या एका घटनेत, शिंदे शिवसेनेच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांच्यावर मतदाराला अरेरावी केल्याचा आरोप आहे. मतदारांनी प्रश्न विचारताच प्रियंका पाटील यांनी आक्रमकपणे, “आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ,” असे म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मतदाराच्या हक्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्यामुळे राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे. हे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांवर सध्या टीका होत आहे.

Published on: Jan 11, 2026 10:17 AM