युती झाली आता धुसफुस सुरु, संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना नेमका सल्ला काय?

| Updated on: Jan 27, 2023 | 9:25 AM

prakash ambedkar, sanjay raut, vanchit aghadi, ncp, nana patole, shivsena maharashtra, shard pawar, uddhv thackarey

Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( prakash ambedkar ) यांनी युतीची घोषणा केली. मात्र, शिवसेना ( shivsena ), काँग्रेस ( congress )  आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( ncp ) यांच्या महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश झालेला नाही. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आंबेडकर यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची सध्या युती झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकर भविष्यात महाविकास आघाडीचे घटक होतील. ती प्रक्रिया सुरु होणार असेल तर या आघाडीतील जे प्रमुख स्तंभ आहेत. नेते आहेत त्यांच्याविषयी सगळयांनी एकमेकांचा आदर ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.