पुण्यातील मुळशीमध्ये ‘द केरला स्टोरी’ मोफत शो; चित्रपटगृहात महिलांनी घेतली ‘ही’ शपथ

| Updated on: May 23, 2023 | 2:17 PM

VIDEO | पुण्यातील मुळशीमध्ये हिंदू गर्जना प्रतिष्ठानकडून 'द केरला स्टोरी' मोफत शो, चित्रपटगृहात महिलांनी घेतली 'ही' शपथ

Follow us on

पुणे : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटात अदा शर्मा हिने मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटावरून राजकारण सुद्धा पाहायला मिळत आहे. अशातच अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध सुद्धा दर्शविण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटाला पंसती देखील पाहायला मिळाली आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील हिंदू गर्जना प्रतिष्ठान वतीने द केरला स्टोरी हा चित्रपट, ग्रामीण भागातील 700 महिला आणि मुलींना मोफत दाखविण्यात आला होता. सलग तीन दिवस हिंदू गर्जना प्रतिष्ठानकडून या चित्रपटाच्या मोफत शोच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी चित्रपट गृहात महिलांनी हिंदू धर्म जनजागृतीची शपथही घेतली. हिंदुत्वाचा जागर करत चित्रपटात देण्यात आलेला संदेश घराघरात पोहचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.