Anil Deshmukh यांनी जे स्टेटमेंट दिलंय ते सत्य, Nawab Malik यांची माहिती
नवाब मलिक

Anil Deshmukh यांनी जे स्टेटमेंट दिलंय ते सत्य, Nawab Malik यांची माहिती

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 7:15 PM

केवळ अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी परमबीर सिंग आरोप करत आहेत. त्यांनी काही स्टेटमेंट दिलंही असेल. पण प्रत्येक स्टेटमेंट खरंच असतं असं नाही. शिवाय ज्याच्यावर आरोप आणि संशय आहे त्या व्यक्तिच्या स्टेटमेंटवर तर अधिक शंका असते, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) हे अँटालिया प्रकरणातील मास्टरमाइंड आहेत. एनआयएलाही त्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणातून परमबीर सिंग यांना वाचवण्याचा केंद्र सरकार (central government) आटोकाट प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केला आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिंग यांच्याबाबत दिलेली माहिती खरी असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. केवळ अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी परमबीर सिंग आरोप करत आहेत. त्यांनी काही स्टेटमेंट दिलंही असेल. पण प्रत्येक स्टेटमेंट खरंच असतं असं नाही. शिवाय ज्याच्यावर आरोप आणि संशय आहे त्या व्यक्तिच्या स्टेटमेंटवर तर अधिक शंका असते, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.