कोरोनाची तिसरी लाट आली, नागरिकांनी शिस्त पाळावी – थोरात

| Updated on: Jan 07, 2022 | 11:16 PM

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कोरोनातून बरे होताच त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये थोरात यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

Follow us on

संगमनेर : बाळासाहेब थोरात यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी कामाला सुरुवात केली. थोरात यांनी आज तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळे प्रसार माध्यमांशी बोलताना थोरात यांनी म्हटले आहे की,  राज्यात तिसरी लाट आली आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोरोनामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपन लॉकडाऊनचा सामना करत आहोत. लॉकडाऊनमुळे आधिच मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता जर लॉकडाऊन नको असेल तर सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. अधिवेशनामुळे कोरोनाच जास्त प्रादुर्भाव झाला असे माझे वैयक्तीक मत आहे. अनेक लोकप्रतिनिधिंना कोरोनाची लागण झाली. एकत्र आल्याचा काय परिणाम होतो, हे सर्वांनीच अनुभवले त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.