मुंबईत सर्वाधिक प्रदूषण, अजित पवार म्हणाले तुझं ‘खोकं’ होईल नाय तर…

मुंबईत सर्वाधिक प्रदूषण, अजित पवार म्हणाले तुझं ‘खोकं’ होईल नाय तर…

| Updated on: Jan 19, 2023 | 1:31 PM

देशात सर्वाधिक जास्त प्रदूषण मुंबईमध्ये आहे. आम्ही म्हणजे मी, तात्याराव लहाने, रागिणीताई जिथे रहातो तिथे जास्त प्रदूषण आहे. आम्ही तिथे राहतो म्हणून नाही, पण, नाईलाजास्तव तिथे रहावे लागते.

बारामती : देशात दिल्ली, मुंबई आणि पुणे येथे जास्त प्रदूषण आहे. हे प्रदूषण कमी झाले पाहिजे. त्याचाच परिणाम आरोग्यावर होतो. डॉक्टर वेळोवेळी आपल्याला काही गोष्टी सांगतात. त्यामागे सायन्स असते अंधश्रद्धा नाही हे लक्षात घ्या, असे अजित पवार यांनी सांगितले.

माझ्या डोळ्याला रेजिना झाला तेव्हा लगेच ऑपरेशन केले. शेतात बांध घालतो तसा बांध घालावा लागेल असे डॉक्टर म्हणाले. लगेच ऑपरेशन उरकून घेतलं. दहा लाखात एखाद्याला जो आजार होतो तो मला झाला. आपल्या आरोग्याची आपणच काळीज घेतली पाहिजे. डॉक्टर आपल्याला सांगतात परंतु आपणही काळजी घ्यायला हवी, व्यसनाधीन होता कामा नये.

पी दारू, खा गुटखा आणि ओढ तंबाखू बिडी वर म्हणतात मी कसा आजारी पडलो? मित्राने आनंदाने सांगितले चल टाकू तर त्याला सांगा तुझी तूच टाक, जमल्यास त्यालाही टाकण्यापासून रोखा. शरीराला तुम्हीच अपाय करताय. नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करता. मग काय होईल तुमचं खोकं होईल नाय तर काय होणार? काही झालं तरी व्यसनापासून दूर रहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Published on: Jan 19, 2023 01:31 PM