MIM बरोबर युती होऊच शकत नाही- नितेश राणे
शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील, अशी टीका शनिवारी भाजप नेते नितेश राणे यांनी केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल ‘एमआयएम’चे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली.
शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्वाची चादर बाजूला टाकली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ‘आयसीस’शीही चर्चा करतील, अशी टीका शनिवारी भाजप नेते नितेश राणे यांनी केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल ‘एमआयएम’चे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप ‘एमआयएम’वर केला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे खासदार जलील म्हणाले. तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय…’ असा खोचक सल्लाही दिला. शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. मात्र, ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे वक्त्यव्य आज राजेश टोपे यांनी केले आहे. टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ‘एमआयएम’बाबत ‘राष्ट्रवादी’चा सॉफ्ट कॉर्नर असल्याचेही बोलले जात आहेत. या प्रस्तावानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत शिवसेना हिरवी सेना झाल्याची टीका केलीय. नितेश राणे यांनीही तोच सूर आळवलाय.
