राज ठाकरेंच्या सभेला पुण्यातून जाणार 12 ते 15 हजार मनसैनिक
वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादकडे (Aurangabad) मार्गस्थ होणार असल्याची माहिती मिळत आहे.
वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादकडे (Aurangabad) मार्गस्थ होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा असणार आहे. तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक (MNS) पुण्यातून जाणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्या येथूनही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला येणार आहेत, असा काल मनसे नेत्यांनी दावा केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ही सभा चर्चेत आहे. या सभेच्या परवानगीसाठी मनसे नेत्यांची फौज मैदानात उतरली होती.
