अर्नाळा किल्ल्याजवळीत घरांमध्ये शिरलं भरतीचं पाणी
विरारच्या अर्नाळा किल्ल्यातील समुद्राच्या जवळ असणाऱ्या घरात रात्री पाणी शिरले आहे. भरतीच्या लाटा देखील घराच्या भिंतीवर आदळून पाणी घरात शिरल्याने रहिवाशांचे मात्र रात्रभर हाल झाल्याची माहिती मिळाली आहे.
विरारच्या अर्नाळा किल्ल्यातील समुद्राच्या जवळ असणाऱ्या घरात रात्री पाणी शिरले आहे. भरतीच्या लाटा देखील घराच्या भिंतीवर आदळून पाणी घरात शिरल्याने रहिवाशांचे मात्र रात्रभर हाल झाल्याची माहिती मिळाली आहे. दर पावसाळ्यात अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावरील घरात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान होते. तसेच अनेक घरांची पडझड ही होते.अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनार्यावर तटबंदी बांधावी अशी रहिवाशांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. पण शासन दुर्लक्ष करीत असल्याने राहिवाशाना मात्र पावसाळ्यात आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्यात मोठा फटका सहन करावा लागत असल्याची खंत तिथल्या नागरिकांनी व्यक्त केली. समुद्राचं घरात कसं शिरल आहे हे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
Published on: Jun 16, 2022 10:52 AM
