आजच्या दिवशी भरला जुळ्या मुलांचा मेळावा

आजच्या दिवशी भरला जुळ्या मुलांचा मेळावा

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 11:45 PM

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आज एक अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आज 22/02/22 अशी तारीख असल्याने इस्लामपूरमध्ये जुळ्या मुलांचा मेळावा भरवण्यात आला होता.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये आज एक अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आज 22/02/22 अशी तारीख असल्याने इस्लामपूरमध्ये जुळ्या मुलांचा मेळावा भरवण्यात आला होता. या जुळ्या मुलांमध्ये एकूण 35 मुलांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. जुळ्या मुलांनी सादर केलेले कार्यक्रम बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या जुळ्या मुलांच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहूणे म्हणून जुळ्या पाहुण्यांनाच बोलवण्यात आले होते. आज तारीखही खास असल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांच्या या कार्यक्रमाला मोठ्यांचीह तुफान गर्दी होती. परिसरातील वेगवेगळ्या भागातील आलेल्या या जुळ्या मुलांच्या कार्यक्रमाने वाहवा मिळवली.